लोणावळा / वार्ताहर :
वडगाव मावळ येथील माळीनगर भागात रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंगमध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्डयावर लोणावळा व वडगाव मावळ पोलिसांनी छापा टाकत 16 लाख 84 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह 10 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
येथील माळीनगर भागात वाहतूक पोलीस चौकीच्या पाठीमागे रोशन मंजिल नावाच्या बिल्डिंगमध्ये कल्याण मटका नावाने जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 18 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वडगाव पोलिसांच्या पथकाला सोबत घेऊन त्याठिकाणी संयुक्त धडक छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या 10 जणांना अटक करत घटनास्थळावरुन रोख रक्कम, 3 चारचाकी वाहने, 5 दुचाकी वाहने, 16 मोबाईल फोन असा एकूण 16,84,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मदन मारुती वाजे, नवनाथ पंढरीनाथ भिलारे, लालजी लक्ष्मीदास ठक्कर, नितीन बालु कांबळे, इरफान लतिफ शेख, भिमराव हरिश्चंद्र गायकवाड, राहुल संभाजी पवार, योगेश दशरथ शिंदे, आकाश शिवाजी इंगळे, करण रमेश पवार यांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 12 (अ), 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयामध्ये जुगाराच्या अड्डयासाठी सार्वजनिक ठिकाणी सदनिका उपलब्ध करून देणारा बिरजु रामविलास माथुर तसेच त्यांचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागले नाहीत. वडगाव मावळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करीत आहेत.