छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज मतदान संपन्न होत आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर चुरशीने मतदान सुरु आहे. दुपारी २ वाजेपर्यंत 82 टक्के मतदान झाल्याची माहीती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या आज मतदानादिवशी दुपारपर्यंत 13538 सभासदापैकी 11221 सभासद मतदारांनी आपल्या मतदाना हक्क बजावला. यामध्ये एकूण 82.89 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 4906 मतदारांनी तर 12 वाजेपर्यंत 9309 सबसदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.