धीरज बरगे,कोल्हापूर
Rajaram Sugar Factory Election Kolhapur : राजाराम साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सत्ताधारी महाडिक आणि विरोधक सतेज पाटील गट यांच्यात पुन्हा एकदा पॉलिटिकल वॉर सुरू झाले आहे. याआधी राजारामची निवडणूक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याभोवती फिरत असे. यंदा मात्र वेगळे चित्र असणार आहे. महादेवराव महाडिक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असून माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे निवडणुकीचे सर्व नियोजन आणि राजकीय गणितांची सूत्रे महाडिक गटाने सोपविली आहेत. त्यामुळे आता काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासमोर महादेवराव महाडिक यांच्याऐवजी त्यांचे पुत्र माजी आमदार अमल महाडिक यांचे आव्हान असणार आहे.
कोल्हापूरच्या राजकारणातील कट्टर विरोधक असणारे महाडिक आणि पाटील गट आता राजाराम निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समोरा-समोर आला आहे. आमच ठरलयं पॅटर्न राबवत 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून सतेज पाटील यांनी महाडिक यांचा एक एक राजकीय किल्ला उद्धवस्त केला. लोकसभा पाठोपाठ विधानसभा आणि त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. गोकुळच्या निवडणुकीनंतर ‘आता राजाराम उरलयं’ अस म्हणत पाटील गटाने राजाराम कारखान्याचे रणशिंग फुंकले. दरम्यान धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार झाले. यानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. या घडामोडीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात मागे पडलेल्या महाडिक गटाला पुन्हा उभारी मिळाली आहे. त्यामुळे राजारामची निवडणुक आता पाटील गटाला म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही.
‘राजाराम’चे कार्यक्षेत्र काढले पिंजून
माजी आमदार अमल महाडिक यांनी गेल्या अडीच वर्षांपासूनच कारखान्याचे कार्यक्षेत्र पिंजून काढत आहेत. याकाळात त्यांनी तब्बल चार वेळा सभासदांच्या गाठी-भेटी घेतल्या आहेत. आता निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ते सभासदांच्या समोर जात आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षातील संपर्काचा फायदा निवडणुकीत होईल अशी अपेक्षा महाडिक गटाकडुन व्यक्त होत आहे.
मतदारांच्या भेटीसाठी नेते बांधावर
राजारामची निवडणुक महाडिक-पाटील गटासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनेत युद्धपातळीवर प्रचार यंत्रणा राबविली आहे. ज्या-त्या भागातील नेते, कार्यकर्ते यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे असले तरी एक, एक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांच्या भेटीसाठी नेते आता थेट शेतीच्या बांधावर पोहोचत आहे. नेत्यांचे बांधावरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बावडा, शिरोलीत गठ्ठा मतदानासाठी प्रयत्न
कसबा बावड्यात आमदार सतेज पाटील यांचे प्राबल्य आहे. तर पुलाची शिरोलीत अमल महाडिक यांचे वर्चस्व आहे. या दोन्ही गावात कारखान्याचे सुमारे 1 हजारहून अधिक सभासद आहेत. दोन्ही नेत्यांचे होमपिच असलेल्या या गावांचे निवडणुकीत महत्त्व वाढले असून कसबा बावडा आणि पुलाची शिरोली येथून एक गठ्ठा मतदान आतल्या पारड्यात कसे पडेल यासाठी दोन्ही बाजूने व्यूहरचना आखली जात आहे.
‘शिट्टी वाजवणार’ की, ‘आमचं ठरलयं’ खरं होणार
राजकीय चढउतार अनुभवल्यानंतर सतेज पाटील आणि अमल महाडिक हे दोन्ही नेते 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजारामच्या निवडणुकीत थेट आमने-सामने आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आप्पांची विजयी शिट्टी अमल वाजवणार का?, सतेज यांचा आमचं ठरलयं पॅटर्न या निवडणुकीतही यशस्वी ठरणार? याकडे राजकीय वर्तुळाचेच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्याचे
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment