पणजी : बिहार राज्याचे 41 वे राज्यपाल म्हणून राजेंद्र आर्लेकर यांचा शपथविधी झाला असून त्यांनी हिंदीतून शपथ घेतली. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा झाला. पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चक्रधारी शरणसिंग यांनी आर्लेकर यांना शपथ दिली. आर्लेकर हे गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी आमदार, मंत्री तसेच सभापती अशी महत्त्वाची पदे गोवा राज्यात भूषविली आहेत. यापूर्वी ते हिमाचल प्रदेशचे जुलै 2021 पासून राज्यपाल होते. तेथून त्यांची बदली बिहारसाठी करण्यात आली असून त्यांनी तेथील पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. आर्लेकर येण्यापूर्वी तेथे फागू चौहान हे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून बदली झाली आहे.
Previous Articleसंयुक्त संसदीय समिती नेमा :प्रवीण चक्रवर्ती
Next Article राजधानीत आज कार्निव्हलची धूम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.