पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे नेते आरसीपी सिंह यांनी शनिवारी जेडीयूच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या मूळ गावातून राजीनामा देण्याची घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री सिंह हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जेडीयूने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पक्षनेतृत्त्वावर केला आहे. सिंह हे हे आयएएस अधिकारी राहिले आहेत.