राणी मुखर्जी ही बॉलिवूडमध्ये 90 च्या शतकापासून स्वत:च्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. राणी लवकरच आता स्वत:ची हिट क्राइम थ्रिलर फ्रेंचाइजी मर्दानीच्या तिसऱ्या चित्रपटात दिसून येणार आहे. यासंबंधीची माहिती तिनेच दिली आहे. मर्दानी 2 या चित्रपटाला यश मिळाल्यानेच मर्दानी 3 हा चित्रपट तयार केला जात असल्याचे तिने सांगितले आहे. चित्रपटाची संकल्पना सध्या केवळ विचारात आहे. वायआरएफकडे एक उत्तम आणि ठोस कहाणी सादर झाल्यावर मर्दानी 3 ची प्रक्रिया पटकथेच्या टप्प्यात पोहोचणार असल्याचे तिने म्हटले आहे. 2014 मध्ये राणी मुखर्जीने पोलीस अधिकारी शिवानी रॉय ही भूमिका साकारून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. यानंतर 2019 मध्ये याचा सीक्वेल मर्दानी 2 प्रदर्शित झाला होता आणि तो देखील यशस्वी ठरला होता.मर्दानी 2 चित्रपट करताना मी घाबरून गेले होते. कारण मी त्यापूर्वी कधीच कुठलाच सीक्वेल केला नव्हता. प्रत्येक चित्रपट संपल्यावर मी माझ्या व्यक्तिरेखा मागे सोडून देते. पुन्हा जुन्या व्यक्तिरेखेत शिरणे मला शक्य होईल की नाही हे मला त्यावेळी माहित नव्हते. परंतु मर्दानी 2 चित्रपट करताना मला आनंद मिळाला. याचमुळे आता मी या व्यक्तिरेखेचा तिसरा भाग पुन्हा करू इच्छिते असे राणीने म्हटले आहे.
Previous Articleभारताचा आज नेपाळशी सामना, पावसाचे सावट कायम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.