Ranmanus Prasad Gawde today in Korgaonkar lecture series
श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला अंतर्गत १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शाश्वत पर्यटन या विषयावर निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक, रानमाणूस प्रसाद गावडे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत आहेत. गावडे हे गेली काही वर्षे पर्यावरण संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवत आहेत. सोशल मीडियातून ते शाश्वत पर्यावरण विषयक जनजागृती करत आहेत. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोन्द्रे यानी केले आहे.
सावंतवाडी : प्रतिनिधी