तारीख 8 ते 14 नोव्हेंबर 2023 पर्यंत
मोक्षाचे मायाजाल
(ग्रहण, राहू-केतूचे राशी परिवर्तन आणि शनीचे मार्गी होणे)
वाचकहो, सहसा मी खगोलीय घटना जसे ग्रहण, ग्रहांचे राशी परिवर्तन इत्यादी विषयांवर लिहायचे टाळतो, याचे एक कारण असे की जे सांगायचे आहे त्यात थोडाफार क्लिष्टपणा येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे लेख सगळ्यांना आवडेलच असे सांगता येत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून कित्येक लोकांनी 28 तारखेच्या चंद्रग्रहणाबद्दल, राहू आणि केतूंच्या राशी परिवर्तनाबद्दल, शनिच्या मार्गी होण्याबद्दल फोनवर विचारणा केली आणि त्यामुळे हा लेख लिहिण्याचे ठरवले. तसे पाहायला गेल्यास व्हाट्सअप युनिव्हर्सिटी (!), फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडिया यावरती या सगळ्या गोष्टींचा महापूर आलाच आहे. ‘इन राशीयो की बदलेगी किस्मत, करोडपती बन जायेंगे इन राशियों के लोग, अमुक करा आणि तमुक करा, लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल, इतक्या राशींना हे बदल त्रासदायक ठरतील’ अशा अनेक भविष्यवाण्या तुम्ही पाहिल्या/वाचल्या असतील. पत्रिकेमध्ये 12 घरे, 12 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र यांच्यापासून निर्माण होणाऱ्या जवळजवळ असंख्य कॉम्बिनेशन्समधून नेमका कुठला रिझल्ट मिळणार हे ढोबळमानाने सांगणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे आहे. म्हणूनच ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाची साथ, समुपदेशनाचे कसब, आणि गणिती कौशल्य लागते. बघितली पत्रिका की सांग शांती इतके सोपे ते नाही. गेल्या काही दिवसांमध्ये कित्येक खगोलीय घटना घडल्या. अनंत आकाशाचा जर विचार केला तर पृथ्वीवरील आपला देह आकाशीय अणुरेणुनीच बनलेला आहे यात शंका तर नाही? म्हणजे जे जलात, पृथ्वीत, आकाशात, अग्नीत, वायूत, इतर ग्रहांमध्ये तेच आपल्या शरीरात! बरोबर? म्हणूनच खगोलीय घटनांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो हे सत्य. 28 ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेच्या पहाटे चंद्रग्रहण झाले. 30 ऑक्टोबरला राहूने गुऊच्या मीन राशीत रेवती नक्षत्रात प्रवेश केला आणि त्याच वेळेला केतूने बुधाच्या कन्या राशिमध्ये एन्ट्री घेतली. 4 नोव्हेंबरला 4 महिने आणि 17 दिवसानंतर शनी मार्गी झाला (म्हणजे काय ते नंतर सांगतो). या सगळ्याचा बरा वाईट परिणाम आपल्यावर होणार हे नक्की.
ग्रहण, ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे, ग्रहाची अवस्था म्हणजे मार्गी, वक्री, स्तंभी या सगळ्या टेक्निकल जंजाळात न पडता आपापल्या राशीवर त्याचा काय परिणाम होतो आणि परिणामांच्या निगेटिव्ह बाजूला पॉझिटिव्ह कसे करून घ्यावे हे या लेखाचे प्रयोजन आहे. पहिल्यांदा ग्रहणाबद्दल समजून घेऊया. खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती याशिवाय पूर्ण, आंशिक आणि पेनुम्ब्रल (Penumbral eclipse) असेही ग्रहणाचे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकाराचा काही ना काही परिणाम आपल्यावर होतोच. सामान्यत: एका शतकामध्ये जवळपास 240 सूर्य/चंद्र ग्रहणे होतात. ग्रहणाच्या बाबतीमध्ये आदी काळापासून आपल्या मनात असलेली भीती गेली नाही हेही तितकेच सत्य आहे. तीन ग्रह एका रेषेत आल्याने (आणि त्यात राहू आणि केतूचा रोल असल्याने!) नैसर्गिकरित्या घडणाऱ्या खगोलीय घटनेला ज्योतिषीयदृष्ट्यादेखील महत्त्व आहे. ग्रहण कोणत्या राशीत घडत आहे कोणाच्या नक्षत्रात घडत आहे, राशीच्या कोणत्या चरणावर घडत आहे त्याचा चरण स्वामी कोण आहे यावरून त्या ग्रहणाचा काय परिणाम सगळ्या राशींवर होईल याचा अंदाज घ्यावा लागतो. त्याचबरोबर या ग्रहणामध्ये इतर ग्रहांबरोबर होणारे योग सुद्धा पहावे लागतात. केवळ ग्रहण ज्या राशीत लागेल म्हणून त्या राशीला वाईट फळ मिळेल असे अजिबात नसते. ग्रहणात पाळायचे नियम, ग्रहणाचे वेध व त्याचे नियम इत्यादी गोष्टी सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहेत ज्याचा ज्योतिषशास्त्राशी केवळ उपासनेच्या आणि दानाच्या दृष्टीने संबंध आहे. जेव्हा तीन ग्रह आणि एक छायाग्रह एका रेषेमध्ये असतात त्यावेळी घडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या प्रभावात आपल्या उपासनेला वाढवून आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा हा राजमार्ग आहे यात मात्र शंका नाही.
(या वेळचे राशिभविष्य हे शनीच्या मार्गी होण्याच्या आधारे लिहिलेले आहे.)
मेष
मेषवाल्यांना शनीचे मार्गे होणे हे अनुकूल ठरेल. कौटुंबिक आणि प्रोफेशनल संबंधांमध्ये सुधारणा होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळण्याची शक्मयताही आहे. मुख्य म्हणजे गुप्त शत्रूंपासून जो त्रास चालू होता तो आता बंद होईल. मनात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येईल. आर्थिक त्रास कमी होईल.
उपाय: मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला घाला
वृषभ
भाग्योदयाकडे वाटचाल चालू होणार आहे त्यामुळे सगळ्या बाजूने प्रयत्न करणे सोडू नका. मुळात राजयोगकारक असलेला तुमचा शनी तुमच्या वाटेत येणाऱ्या विघ्नांचा नाश करेल. नोकरीत बदल नवीन नोकरी लागणे व्यापार वृद्धी असे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल. प्रेमसंबंधांमध्ये सफलता प्राप्त होईल.
उपाय : वापरलेले कपडे आणि चप्पल गरजूंना दान द्या
मिथुन
काहीसे संमिश्र्र असे ग्रहमान आहे. वैवाहिक जोडीदाराशी असलेले मतभेद कमी होण्याची शक्मयता आहे. पद प्रतिष्ठा मान सन्मान यांची प्राप्ती होईल. विवाह उत्सुक लोकांसाठी नवीन स्थळे येतील आणि विवाह ठरण्याची शक्मयता आहे. काही लोक अकारण त्रास देण्याची शक्मयता नाकारता येत नाही. चांगल्या बातम्या कळतील, फायदा होईल.
उपाय : शनी मंदिरात काळे तीळ ठेवावे
कर्क
कर्क वाल्यांना शत्रूंवरती विजय मिळवण्याचा काळ आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना यश प्राप्तीचे मार्ग खुले होतील. अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून मदत मिळेल. तब्येतीला सुधारावे लागेल. कोर्टकचेऱ्यांमध्ये यश मिळेल. वाद संपतील. जुनी दुखणी मात्र त्रास देऊ शकतात. अशा वेळेला वैद्यकीय मदत घेणे इष्ट ठरेल.
उपाय : पक्ष्यांना दाणे घाला
सिंह
शनीचे मार्गी होणे सिंहवाल्यांना शुभप्रद ठरणार आहे. जुन्या रोगांचा त्रास कमी होईल. तब्येतीत सुधारणा होईल. संततीकडून चांगली बातमी कळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल आणि प्रसिद्धीही मिळेल. आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण काळ असेल. खर्च जपून करावा. नोकरीत बदल संभवतो.
उपाय :पिंपळाखाली चौमुखी दिवा लावा
कन्या
या काळात कन्यावाल्यांची अडीचकी चालू आहे, त्यामुळे होणारी कामे होता होता राहणे, कारण नसताना मनस्ताप अशा घटनांची तुम्हाला सवय झाले. मात्र शनीच्या मार्गे होण्याने प्रॉपर्टीसंबंधी असलेले प्रश्न निकालात निघतील. करियर संबंधी असलेले प्रश्न संपतील. योग्य मार्ग मिळेल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल.
उपाय: मंगळवारी मारूतीला शेंदूर चढवावा
तुळ
तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवेल. लहान भाऊ बहिणीशी असलेले नाते सुधारण्याची शक्मयता आहे. पराक्रम गाजवाल. शनीचे मार्गी होणे तुम्हाला शुभ आहे. मानसिक तणाव कमी होईल. स्थावर मालमत्तेसंबंधी गुंतवणूक करू शकाल. उच्च शिक्षण प्राप्त होण्याच्या संधी प्राप्त होतील. लांबचा प्रवास घडेल.
उपाय : काळ्या गाईला बेसनाचा लाडू खायला घाला
वृश्चिक
आतापर्यंतचा काळ हा थोडा मानसिक तणावाचा काळ होता. कारण मध्ये धनहानी होणे असे प्रसंग घडत होते. ते आता कमी होईल. आत्मविश्वास वाढल्याने कामे पूर्ण होतील. मेहनतीचा मोबदला चांगला मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या संधी प्राप्त होतील, पण अति विचाराने त्या घालवू नका.
उपाय : गरजूंना औषधांचे दान द्यावे
धनु
कायम संघर्ष अशी परिस्थिती जी होती त्यामधून सुटका प्राप्त होण्याचे संकेत आहेत. थोडे रिलॅक्स व्हाल. मानसिक शांती प्राप्त होईल. आयुष्यात आनंदाच्या घटना घडतील. इन्कम सोर्स वाढल्याने कित्येक बाबतीमध्ये दिलासा मिळेल. पण त्याचबरोबर अकारण पैसे खर्च होण्याचीही शक्मयता आहे. चैनीवर पैसे खर्च करू नका.
उपाय: सुवासिक लाल फुलांची माळ, मारूतीला घालावी
मकर
कामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम केल्याने केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ प्राप्त होतील. नवीन ओळखी होतील. अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्मयता आहे. दूरच्या ठिकाणाहून कामासंबंधी संधी मिळतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. विदेश यात्रे करता प्रयत्न करत असाल तर अनुकूल काळ आहे.
उपाय : काजळाची डबी पिंपळाखाली पुरावी
कुंभ
शनीचे मार्गी होणे तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणारे ठरेल. आतापर्यंत मार्ग दिसत नव्हता आता संधी प्राप्त होते. नवीन कामे मिळणे नवीन प्रोजेक्ट मिळणे, नवीन नोकरी करता प्रयत्न करत असल्यास यश मिळणे अशा घटना घडतील. पद प्रतिष्ठेचा लाभ होईल. घरातील व्यक्तींची विशेष काळजी घेणे गरजेचे असेल.
उपाय : हनुमान मंदिरात बुंदीचे लाडू, गोड पान ठेवावे.
मीन
या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी चांगले पद आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्मयता आहे. आर्थिक आवक वाढेल. कामे मनासारखी होतील. विद्यार्थ्यांना यश देणारा काळ आहे, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. आईच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. स्वत:च्या तब्येतीला चांगले ठेवण्याकरता नियमितपणा ठेवणे गरजेचे असेल.
उपाय: शनिवारी काळ्या कुत्र्याला बिस्किट घालावे