गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना; पाटपन्हाळे येथे मध्यरात्री बारा वाजता घडली घटना; क्षमतेपेक्षा जास्त दगडाची होते वाहतूक
गुहागर प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील के एल पी पी एल च्या एलएनजीटीच्या संरक्षणार्थ समुद्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या ब्रेक वॉटर करता लागणाऱ्या दगडाची सुरू असलेली वाहतूक सध्या जीवघेणी ठरत आहे रात्रंदिवस क्षमतेपेक्षा जास्त महाकाय दगड भरून भरगांव वेगाने सुरू असणाऱ्या या डंपरने मध्यरात्री बारा वाजता पेट घेतला मागून वाहन चालवणाऱ्या चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला सदर घटना गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटपन्हाळे येथे घडले आहे.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून सुमारे सात लाख टन काळा दगडाची खान सुरू आहे रात्रंदिवस या ठिकाणाहून पाटपन्हाळे ते अंजनवेल असा 22 किलोमीटरचा मोठमोठे दगड वाहतूक करणारे डंपर भडगाव वेगाने जात आहेत. या अगोदर जास्तीत जास्त फेऱ्या मारण्याच्या नादामध्ये गुहागर वेलदूर मार्गावर असाच डबर वाहतूक करणारा डंपर पलटी होऊन मोठा अपघात घडला होता त्याचप्रमाणे गुरुवारी मध्यरात्री पाटपन्हाळे येथून डबल ची वाहतूक करणारा एपीएस कंपनीचा डंपर पाटपन्हाळे येथे आला असता डंपर ने अचानक पेट घेतला अशावेळी या डंपरच्या पाठवून आलेल्या वाहनाने डंपर चालकाला सावधान केल्याने मोठा अनर्थ टाळला मार्गावरील गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने डंपरला लागलेली आग विझवण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अशा प्रकारचे क्षमतेपेक्षा जास्त दगड वाहतूक करणाऱ्या या डंपर मुळे यापुढेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन लक्ष देईल का अशी मागणी तालुक्यातील वाहनचालक व सर्वसामान्य जनता करत आहे.