चिपळूण/प्रतिनिधी
शहरातील रॉयल नगर येथे मगरीचा संचार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रहिवांशामध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
रॉयल नगर परिसरात असलेल्या नारायण तलावात मगरीचा मुक्त संचार होत आहे. तर अनेक नागरिकांना याचे दर्शन होत आहे. सध्यस्थितीत हा तलाव तुडूंब काटोकाट भरला आहे. त्यामुळे या तलावातील मगरी या इमारतीलगतच्या सांडपाण्याच्या गटराव्दारे रॉयल नगरवस्तीमध्ये येत आहेत. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार घडत असून अनेकांना याचे दर्शन घडत आहे. यामुळे रहिवांशामध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.