रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील खालची आळी येथील बंद पडलेल्या आईस फॅक्टरीच्या मागे नारळाच्या बागेत बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या मौला शेख याला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.30 वा. करण्यात आली.
पोलिसांनी त्यांच्याकडून गोवा बनावटिची 4 हजार 560 रुपयांची दारू जप्त केली. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौला कासम शेख (34, रा. मरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रवीण खांबे यांनी तक्रार दिली. खालची आळी येथे आईस फॅक्टरीच्या मागे असलेल्या नारळाच्या बागेत मौला शेख बेकायदेशीरपणे दारू विक्री करत होता. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.