घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद
गुहागर /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात बुधवार 18 ऑक्टोंबर पासून ते कोंकण विभागातील रायगड लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व ‘संपर्क से समर्थन’ अभियानात भाग घेणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासात प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्यासोबत लोकसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. मंगळवारी रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यक्रम आटवून आज बुधवारी सायंकाळी 4 वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे पोहचतील. सायंकाळी 5 वा. पाटपन्हाळे येथील शृंगारतळी बाजारपेठेत ‘घर चलो अभियानात’ सहभागी होतील व सर्वसामान्य जनतेशी हितगुज करतील. यावेळी भव्य रॅली व कॉर्नर सभा ही होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वा. पाटपन्हाळे येथील मंगल कार्यालयात दापोली व गुहागर या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरिअर्स व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यासोबतच ते गुहागर येथील दुर्गादेवी देवस्थान येथे सुरू असणाऱ्या केंद्र शासनाच्या योजना केंद्राला भेट देणार आहेत.
प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवी नाईक, राज्य लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील, माजी आमदार, गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख विनयजी नातू, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, आ. रवीशेठ पाटील, हरेश भोईर, रवींद्र म्हात्रे, महेश माने, अशोक थळे, मिलिंद वाडेकर, महेश मोहिते, सुधीर चेरकर, सुनील दामले, किरण खरे, महेश कोळवणकर, तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, सचिन ओक, मुनीश जैतपाल, विठ्ठल भालेकर यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.