रत्नागिरी प्रतिनिधी
क्रेडीट कार्ड क्लोज करतो, अशी बतावणी करून महिलेला 40 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राजक्ता दिलीप राठोड (35, ऱा मजगांव कोकणनगर रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े. या प्रकरणी तिने रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून 2022 रोजी प्राजक्ता यांच्या मोबाईलवर शर्मा नावाच्या इसमाने फोन केला होत़ा यावेळी तुमचे क्रेडीट कार्ड क्लोज करतो, असे सांगून प्राजक्ता यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शर्मा नावाच्या व्यक्तीने केल़ा यावेळी शर्मा याने प्राजक्ता यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून 30 हजार 900 रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आह़े.