ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खा. संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला आहे. “लारेन्स के और से मॅसेज है. सलमान और तू फिक्स, सिद्धू मुसेवाला टाईप मारेंगें”, असे या मेसेजमध्ये म्हटले आहे. धमकीच्या या मेसेजनंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राऊत यांच्या मोबाईलवर काल रात्री 9 वाजता एक टेक्स्ट मेसेज आला. “हिंदू विरोधी. मार दूँगा तुझे. दिल्ली में मिल तू एके 47 से उडा दूँगा, मुसेवाला टाईप. लॉरेन्स के और से मेसेज है. सोच ले. सलमान और तू फिक्स”, अशी धमकी या टेक्स्ट मेसेजमधून देण्यात आली आहे. या मेसेजनंतर राऊत यांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्त यांना ही माहिती दिली.
अधिक वाचा : संजय राऊत यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ राऊतांच्या सुरक्षेत वाढ करत तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.