ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या गँगला सुपारी दिल्याचा आरोप काल संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्त आणि जयजीत सिंग आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची दखल घेण्याची मागणी केली होती. राऊत यांच्या पत्राची गृहविभागाने दखल घेतली असून, राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज सिन्नरकडे जाणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे एक पथक नाशिकच्या ‘एक्स्प्रेस इन’ हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षेसाठी 6 पोलीस आणि ताफ्यात एक वाहन तैनात असणार आहे. ठाण्याचे एसीपी राऊत यांचा जबाब नोंदवत आहेत.
अधिक वाचा : कोश्यारींनी मोघम आरोप करू नयेत