ऑनलाईन टीम/तरुण भारत
हैदराबादमध्ये सुरू असलेली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी पक्षाला मार्गदर्शन केलं. इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत केले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, “इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे,” याबाबतची माहिती भाजप नेत्याने दिली आहे.
दरम्यान, हैदराबादमध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पउत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिमांसारख्या समुदायांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पक्षाला केले.