5000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी ः किंमत 7 हजार 499 रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रियलमी इंडियाने काही दिवसांपूर्वी आपला नवीन एंट्री लेवल फोन रियलमी सी30 हे मॉडेल भारतामध्ये सादर केले होते. यामध्ये रियलमी सी30 मध्ये अल्ट्रा स्लिम व्हर्टिकल स्ट्रिप डिझाईन केले आहे. यासह रियलमी सी30सोबत दावा केला आहे, की आपली सेगमेंटमध्ये सर्वात पातळ व हलका स्मार्टफोन राहणार असल्याचे म्हटले आहे.
रियलमी सी30 या मॉडेलची पहिली विक्री ही 27 जून रोजी सुरु केली आहे. रियलमी सी30चे वजन 182 ग्रॅम व अन्य फिचर्सचा तपशील पाहिल्यास यामध्ये युनीसोक टी612 प्रोसेसरसोबत 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार असल्याचेही कंपनीने सांगितले होते.
स्मार्टफोनची किमत
2जीबी रॅम सोबत 32 जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन येणार आहे. सदरच्या स्मार्टफोनची किमत 7,499 रुपये आहे, तसेच 3जीबी रॅमसोबत 32 जीबी स्टोरेजची किमत ही 8,299 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लू, बँबूग्रीन, डेनिम ब्लॅक कलरमध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.