वाहन चालकांकडून समाधान व्यक्त
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड येथील व्यापारी संघटने च्या वतीने मळेवाड ते कोंडूरे रस्त्यावरील, मळेवाड शाळा नं. १ च्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या धोकादायक वळणार सामाजिक बांधिलकीतून रिपेक्टर लावण्यात आले. काही दिवसांपुर्वी या रस्त्याच्या वळणावर, रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला होता. याची दखल मळेवाड जकातनाका व्यापारी संघटने घेत आपल्या मार्फत हे अपघात टाळण्यासाठी रिप्लेक्टर लावण्यात आले. यासंघटने मार्फत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.मागील महिन्यात या संघनेमार्फत बहिर्वक्र आरसा बसविण्यात आला होता. या उपक्रमाबाबत वाहनचालक, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री पांडुरंग गावडे व उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले की आपण असेच वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविणार आहोत.
यावेळी पांडुरंग गावडे,रमाकांत नाईक,मदन मुरकर,संतोष गावडे,रवींद्र तळवणेकर,विशाल नाईक,प्रवीण पार्सेकर उपस्थित होते.