Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर सरकारकडून अधिकृत जीआर जारी करण्यात आला आहे.नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबीचं जातप्रमाणपत्र मिळणार आहे.याचबरोबर नोंदी तपासण्यासाठी 5 सदस्यांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. जीआर सोबत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करणारे पत्र पाठवण्यात आले. यानंतर जरांगे पाटील कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने हा जीआर काढला आहे. वंशावळ तपासून मराठा समाजातील कुणबी समाजाला प्रमाणपत्र देण्यात येईल अस मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होते.
मनोज जरांगे यांच्या उपषोणाचा आजचा 10 वा दिवस आहे. आज जरांगे यांनी सरकारला आवाहन केलं होतं की, जीआरमध्ये काहीसा बदल करा.वंशवळ हा शब्द काढून सरसकट हा शब्द टाका. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी हे प्रमाणपत्र द्या म्हणजे प्रश्न सुटेल, असेही जरांगे यांनी म्हटलं होतं. यानंतर समिती बैठक आणि तज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर काल मुख्यमंत्री यांनी जीआर काढला होता.त्या घोषणेनंतर आता अधिकृत जीआर काढण्यात आला आहे.