मालवण : प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले.
माजी नगरसेवक यतिन खोत यांच्या धुरीवाडा मालवण येथील निवासस्थानी माजी नगरसेवक यतीन खोत यांसह माजी नगरसेविका दर्शना कासवकर, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख समन्वयक सौ. शिल्पा खोत, सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर यांच्या सहकार्यातून शिबीर आयोजित करण्यात आले होते. 134 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी नंदा सारंग, शांती तोंडवळकर, तन्वी भगत, शुभम बारामते, दिया पवार तसेच अनंत पाटकर यांचे सहकार्य लाभले. शिबीर आयोजन करून दिले बाबत आमदार वैभव नाईक यांचे यतीन व शिल्पा खोत यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.