बेळगाव : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच प्रचार कामात व्यस्त असलेल्या नेत्यांनी दि. 7 रोजी मतदान झाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मित्रांसह गोकाक शहरातील आपला मित्र शेट्टी यांच्या स्वीटमार्ट दुकानामध्ये जावून गप्पा मारल्या. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दंड थोपटून निवडणुकीच्या प्रचारात गुंतले होते. जवळपास चार महिन्यांपासून काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात सातत्याने दौरे केले आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघात उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी गुंतून होते. मंगळवारी निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर प्रचारदौऱ्यांना ब्रेक दिला. या धामधुमीतून रिलॅक्समूडमध्ये आलेल्या मंत्री सतीश जारकीहोळी यांनी गोकाक शहरातील आपल्या मित्राच्या शेट्टी स्वीटमार्ट येथे जावून काहीकाळ गप्पाटप्पा केल्या. यावेळी अनेक नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleजनजागृतीमुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ
Next Article आता उत्सुकता निवडणूक निकालाची
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.