शिराळा / वार्ताहर
शिराळा (ता.शिराळा) पंचायत समितीच्या सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा गणासाठी आरक्षण सोडत आज पंचायत समितीच्या सभागृृहात जाहीर करण्यात आली.ही सोडत जाहीर होताच चर्चांना उधाण आले होते. तर इच्छुकांची नाराजी स्पष्ट जाणवत होती. भूमिसंपादन उपजिल्हाधिकारी अजयकुमार नष्टे , तहसीलदार गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार अरुण कोकाटे , गटविकास अधिकारी संतोष राऊत , सहायक गटविकास अधिकारी आर.एस.माने यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. शिराळा पंचायत समितीच्या दहा गणासाठी ही सोडत काढण्यात आली. शालेय विध्यार्थी समर्थ सूर्यवंशी याच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या सर्वांच्या समोर काढण्यात आल्या.
गत निवडणुकीत जिल्हा परिषदचे चार गट होते तर यावेळी सागाव जिल्हा परिषद गट वाढला आहे. त्याच बरोबर पंचायत समितीचे आठ गणं होते. तर यावेळी सागावं व देववाडी यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट वाढला आहे. तर पंचायत समितीचे देववाणी व येळापूर हे दोन गणं वाढले. शिराळा पंचायत समितीच्या सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा गणांसाठी व जिल्हापरिषदेच्या पाच गटांसाठी पुढील प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. जिल्हा परिषद प.त.वारुण गट – सर्वसाधारण यामध्ये येणारे पंचायत समितीचे प.त.वारुण गण -सर्वसाधारण स्त्री तर मणदूर हे गण -नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाला आहे.तर जिल्हा परिषद वाकुर्डे बुद्रुक गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग, पंचायत समितीच्या वाकुर्डे बुद्रुक गण -सर्वसाधारण व पाचुंब्री गण -अनुसूचित जाती तसेच जिल्हापरिषदेचा कोकरूड गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग तर पंचायत समितीच्या गणातं कोकरूड गण -सर्वसाधारण स्त्री, येळापूर गण -सर्वसाधारण याच बरोबर सागाव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण स्त्री तर पंचायत समिती गणात सागाव गण -सर्वसाधारण तसेच कणदुर गण -सर्वसाधारण स्त्री याच बरोबर नविन झालेल्या जिल्हा परिषद गटामध्ये मांगले गट-सर्वसाधारण व मध्ये येणाऱ्या पंचायत समितीच्या गणातं मांगले गण -सर्वसाधारण स्त्री देववाडी गण -सर्वसाधारण स्त्री अशा प्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर सदर आरक्षणवरती कोणाची काही तक्रार असल्यास २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती सम्रासिंह नाईक, माजी उपसभापती बी.के. नायकवडी ,कक्ष अधिकारी बी.आर. पाटील, प्रकाश पाटील, महेश व्हावळ ,किरण काशिद , डी.डी.थोरात, आर.एस. मठकरी , मनोज जाधव, विजय पाटील, नाना करांडे, आदी उपस्थित होते.