स्पर्धेत एअरटेल, व्होडाफोनही प्रवेश करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमने 5 जी लिलाव सुरु होण्यापूर्वी जवळपास 14,000 कोटी रुपयांची रक्कम ऍडव्हान्स स्वरुपात जमा केली आहे. भारती एअरटेलनेही 5,500 कोटी रुपये आगाऊ जमा केले आहेत. दूरसंचार वेबसाईटवर पूर्व-पात्र बोलीदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार अदानी डेटा नेटवर्क्सची ईएमडी रक्कम 100 कोटी रुपये आहे.
लिलावाअगोदर दूरसंचार कंपन्यांनी आपली लिलावाची रक्कम जमा करत आहेत. व्होडाफोन आयडियाने ऍडव्हान्स म्हणून 2,200 कोटी रुपये उभे केले आहेत. 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव येत्या 26 जुलैपासून सुरु होणार असून यामध्ये कमीत कमी 4.3 लाख कोटी रुपयांच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमला लिलावासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.