प्रतिनिधी /पणजी
बाणावली येथील पर्यावरणवादी, प्राणी आणि निसर्गप्रेमी हेमा नाडकर्णी (74) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मडगाव येथील ऊग्णालयात निधन झाले.
नाडकर्णी ह्या दक्षिण गोवा वेल्फेअर ट्रस्ट फॉर अॅनिमल (एसजीडब्ल्यूटीए) च्या अध्यक्षा आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि गोवा बर्ड्स कॉन्झर्वेशन नेटवर्क (जीबीसीएन) च्या आजीवन सदस्य होत्या.
त्यांनी अनेक भटक्या कुत्र्यांना त्यांच्या बाणावली येथील घरात आश्रय दिला . एक निसर्ग प्रेमी म्हणून त्यांनी बाणावली मॉन्टे टेकडीच्या हिरवळीसाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती किशोर नाडकर्णी असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.