म्हापसा : म्हापसा येथील एका व्यावसायिक बहुमजली इमारतीच्या लिफ्टमध्ये एक 49 वषीय महिला तासभर अडकडली. मात्र म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत या महिलेची सुखरूप सुटका केली. विद्युतप्रवाह खंडित झाल्याने सदर लिफ्ट बंद पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना सोमवारी दि. रोजी सायं. 3.30 च्या सुमारास घडली. सदर महिला ही लिफ्टमधून जाताना विद्युतप्रवाह खंडित झाल्याने सदर लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर बंद पडली. या इमारतीला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लिफ्ट चालू राहण्यासाठी पर्यायी इनव्हर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था नसल्याने सदर लिफ्ट काम करत नाही. या प्रकारामुळेच पीडित महिला तासभर लिफ्टमध्ये अडकून राहिली. सदर महिला या इमारतीत साफसफाईचे काम करते. काही लोकांनी अग्निशमन दलाचे पाचारण केले. दलाचे जवान येईपर्यंत लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलेस धीर देण्याचा प्रयत्न याच लोकांनी केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला लिफ्टच्या बाहेर घेत तिची सुखरूप सुटका केली.
Previous Articleभाजपसोबत कोणतीही सेटिंग नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.