कोणाचीही हरकत नाही.सर्वानुमते ठराव संमत.
डिचोली/प्रतिनिधी
शिरगाव डिचोली येथील शिरगाव पंचायतीच्या ग्रामसभेत गावातील खाण लीज लिलाव प्रक्रिया व पुढील खाण प्रक्रियेला पाठिंबा करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. सदर ठराव कोमुनिदाद समितीचे अध्यक्ष अजय गावकर यांनी मांडला होता. त्यास कोणीही हरकत घेतली नाही.
शिरगाव गावातील खाण व्यवसायावरून गावात विविध वादचे विषय निर्माण झाले होते. एका गटाकडून शिरगावात खाण लीज लिलाव व खाण प्रक्रियेपूर्वी गावासाठी विविध अटी घालण्यात आल्या होत्या. सदर अटी मान्य झाल्याशिवाय खाणी सुरू करायला देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. तर नंतर शिरगाव कोमुनिदाद समितीने पत्रकार परिषद घेऊन खाण लिलाव व खाण प्रक्रियेला पाठिंबा जाहिर केला होता. गावच्या विकासासाठी व बेरोजगारी घटविण्यासाठी खाणी सुरू व्हाव्यात असा मुद्दा कोमुनिदाद समितीने मांडला होता.
या विषयावरून ग्रामसभेत मोठी चर्चा होण्याची चिन्हे होती. परंतु अजय गावकर यांनी मांडलेल्या ठरावावर कोणीही हरकत घेतली नाही. त्यावर चर्चा होऊन तो ठराव.संमत करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत अच्य?त गावकर, बाळा गावकर, विश्व?भर गावकर, योगेश गावकर, सिध्देश गावकर, महादेव गावकर व इतरांनी सहभाग घेत सकारात्मक पाठिंबा दर्शवला. त्यानंतर सदर ठराव एकमताने संमत करण्यात आला.
शिरगावातील बेरोजगारीचा प्रश्न मिटावा, ट्रक व यंत्रांना काम मिळावे, खाण बंदीमुळे अनेकांची कर्जे थकलेली आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी खाणी सुरू होणे आवश्यक आहे. शिरगाव गावतील लीज घेणाऱयां कंपनीकडे रोजगार, गावातील साधनसुविधा विकास, कोमुनिदाद इमारत व क्रिडा मैदान, गावातील अपंग, विधवा व गरीब लोकांना खास आर्थिक पेकेज, गावातील खाण जमिनींचा पृ÷भाग हक्क व रॉयल्टी, गावातील लोकांचा विमा अशा मागण्या या गावातील खाण लीज घेणाऱया कंपनीकडे करण्यात येणार आहेत, असे अजय गावकर यांनी सांगितले.
ग्रामसभेला सरपंचा करिष्मा गावकर, उपसरपंच जयंत गावकर, पंचसदस्य देवराज गावकर, सुर्यकांत पाळणी व वेदिका शिरगावकर यांची व ग्रामस्था?ची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.