मुंबई
एरोफ्लेक्स इंडस्ट्रिजचा आयपीओ मंगळवारी खुला झाला असून त्याला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद नोंदवला आहे. इशु दुपारी 2.30 वाजेपर्यंत 4.44 पट सबस्क्राइब झाल्याची माहिती आहे. 351 कोटी रुपये या आयपीओअंतर्गत एरोफ्लेक्स उभारणार आहे. 24 ऑगस्ट रोजी आयपीओ बंद होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांनी आयपीओअंतर्गत 103 कोटी रुपयांची उभारणी केली असल्याचे समजते. 1 सप्टेंबर 2023 रोजी समभाग बाजारात लिस्ट होण्याची शक्यता सांगितली जात आहे.