प्रतिनिधी /बेळगाव
कलामंदिरच्या जागेत बहुमजली इमारत बांधकामात अडथळा ठरणारे व्यापारी गाळे हटविण्यात आले. या कारवाईवेळी गाळेधारकांचे साहित्य मनपाच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले होते. हे साहित्य सोमवारी गाळेधारकांना देण्यात आले. पण काही गाळेधारकांची नावे यादीतून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले.
मागील आठवडय़ात कलामंदिरच्या जागेतील वादग्रस्त गाळे हटविण्याची कारवाई केली होती. नितीन भट यांच्या गाळय़ामध्ये विविध साहित्य आणि शिवणयंत्रे होती. या साहित्याचा पंचनामा करून गाळा हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. कारवाईवेळी भट यांना सूचना देण्यात आली होती. पण नुकसानभरपाई दिल्यानंतरच साहित्य हटवू, असे मनपा अधिकाऱयांना सांगितले होते. साठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत मनपाने गाळय़ामधील साहित्य हटवून इमारतीवर जेसीबी फिरवला होता.
मनपाने ताब्यात घेतलेले साहित्य सोमवारी नितीन भट यांच्याकडे काही मोजक्मयाच अधिकाऱयांच्या उपस्थितीत सोपविले. पण यावेळी न्यायालयाच्या निकालाची प्रत महापालिकेच्या अधिकाऱयांनी दाखविली नसल्याने ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. मनपाच्या अधिकाऱयांनी गाळा हटवून न्यायालयाचा अवमान केला असल्याची टीका नितीन भट यांनी केली. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भट यांनी सांगितले.