प्रतिनिधी/ बेळगाव
नीट परीक्षेत देशात चौथा क्रमांक मिळविलेल्या उचगावच्या ऋचा पावशे हिचा केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी विशेष सत्कार केला. ऋचाने बेळगावचे नाव उंचावले आहे. यापुढेही तिने अशीच कामगिरी करावी, असे प्रभाकर कोरे म्हणाले. याप्रसंगी महांतेश कवटगीमठ, मनोज पावशे, शिवाजी सुंठकर, घोरपडे व रुचाचे पालक उपस्थित होते.