कुंभारजुवे /प्रतिनिधी
तिवरे वरगाव ग्रामपंचायत परिसरातल्या तारीवाडा माशेल येथे इलेक्ट्रकिल डिपार्टमेंट तर्फे भूमीगत केबलिंग चे काम चालू आहे. त्याअंतर्गत त्या संबंधित कंत्राटदाराने तारीवड्यावर रस्ते खणून काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे गेले चार महिने रस्ते भुमीगत वीजवाहीन्यासाठी खोदून ठेवल्याने रस्त्यांची पार दुर्दशा झाली आहे त्यामुळे धुळीचे साम्राज्य या परिसरात झाल्याने घरात सर्वत्र तसेच स्वयंपाक घरात सुध्दा धुळ राहील्याने धुळ प्रदुषणाचा त्रास लहान मुलें व जेष्ठ नागरिक तसेच ऊग्णांना होत आहे.त्यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे
तसेच ह्या त्रासात आणखीन भर म्हणून खांब उभे करण्याच्या कामासाठी 10 फूट खोल ख•s खणून आठ दिवस झाले ते तसेच उघडे सोडून दिले आहेत. त्यामुळे कधीही गँभीर घटना होण्याची दाट शक्मयता आहे.हे ख•s कसलेच सुरक्षित नियम न पाळता तसेच उघडेच सोडून दिल्याने प्राणी (मूक जनावर ) व लहान मुले व जेष्ठ नागरिक तसेच अन्य लोकांना सुद्धा धोकादायक बनले आहे. तरी संबंधित खात्याने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून हे काम युद्धपातळीवर पूर्ण कऊन तिथला धोका दुर करावा असे तारीवड्यावरील सर्व राहिवाश्यांची आग्रही मागणी आहे.