ख•sमय रस्त्यामुळे टायर फुटण्याचे प्रकार : वाहनचालक त्रस्त
वाळपई : गोवा चोरलाघाट बेळगाव या मार्गावरील कर्नाटक राज्याच्या सीमेतील चोरला ते जांबोटी या रस्त्याची झालेली वाताहात व त्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी कणकुंबी येथे सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी 9.30 वाजल्यापासून रास्ता रोको करण्यात येणार आहे. बेळगावला जाण्यासाठी हा रस्ता जवळचा पडत आहे. मात्र चोर्ला ते जांबोटी दरम्यानचा सुमारे 22 किलोमीटर रस्ता खड्डेमय बनला असून वाहने चालवणे मुश्किल बनले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारला जागे करण्यासाठी कणकुंबी परिसरातील ग्रामस्थांनी हा रास्ता रोको आयोजित केला आहे. गोवा सीमेपर्यंत रस्ता चकाचक आहे. मात्र कर्नाटक सीमा सुरू होताच चोर्ला, चौकी, मान, सुरल, कणकुंबी पारवाड, बेटणे, चिखले, आमटे, कालमणी व जांबोटी या गावांतून किंवा गावाजवळून जाणारा प्रमुख रस्ता खड्डेमय झालेला आहे. चतुर्थी उत्सव जवळ आल्यामुळे गोव्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक बेळगावला खरेदीसाठी जातात. सर्व लक्षात घेऊन पारवाड पंचायतीचे सरपंच भिकाजी गावडे यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी रास्ता रोकोची घोषणा केली आहे.
वाहनचालक, प्रवाशांना फटका
गोवा कर्नाटक दरम्यानच्या कर्नाटक परिसरातील रस्त्याची व्यवस्था पूर्णपणे बिकट झालेली आहे .कर्नाटक हद्दीमधील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने नादुऊस्त बनणे, वाहनांचे टायर फुटणे अशा प्रकारच्या समस्यांना वाहन चालक, प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. अनेकठिकाणी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी या रस्त्याची दुऊस्ती न केल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद होण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या भागातून सातत्याने भाजी वाहतूक करणारे गोपाळ गावडे यांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था बिकट बनलेली आहे. अनेकवेळा स्थानिक सरपंच व आमदारांनी रस्त्याचे अवस्थेत संदर्भात कर्नाटक सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारने अजून पर्यंत कानावर हात ठेवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. खडीचे वाहतूक करणारे रामनाथ गरगट्टी यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्यावरून सातत्याने बेळगाव या ठिकाणी बाजारपेठ जाणारे गोमंतकीय संतोष गावकर यांनी सुरल येथे रस्त्याची अवस्था पूर्णपणे बिकट झाल्याचे सांगितले.