ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली नवीन इमारतीच्या कामास मान्यता
सावंतवाडी प्रतिनिधी
गेली १० ते १५ वर्षांहून अधिक काळ सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रश्न भिजत घोंगडे असल्याप्रमाणे होता. अखेर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज सावंतवाडी पंचायत समितीच्या अद्ययावत नवीन इमारत उभारणीसाठी 14 कोटी 60 लाख रुपये मंजूर केले आहेत. आणि नवीन इमारतीच्या कामास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. सावंतवाडी पंचायत समितीची नवीन इमारत न्यू शिरोडा नाका येथील 27 गुंठे जागेत आता उभी राहणार आहे. त्यामुळे तब्बल 14 वर्षांहून अधिक काळ पंचायत समितीच्या इमारतीसाठी मुंबई स्तरावर वनवास करावा लागला होता. तो वनवास आता संपला आहे. ही इमारत व्हावी म्हणून विशेष प्रयत्न माझी उपसभापती शितल राऊळ व माजी जि. प . सदस्या रेश्मा सावंत ,माजी सभापती रवींद्र मडगावकर, मानसी धुरी, माजी सभापती सौ. सावंत, माजी उपसभापती महेश सारंग आदींनी विशेष प्रयत्न केले होते. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी पंचायत समितीची अद्ययावत इमारत व्हावी यासाठी खास निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही प्रयत्न केले. त्याला यश मिळाले आहे.