75 क्षेपणास्त्र डागली ः 17 ठार, 40 हून अधिक जखमी
किव्ह / वृत्तसंस्था
रशियाने युपेनवर पुन्हा एकदा हल्ले तीव्र केले आहेत. रशियाने झापोरिझियावर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात झापोरिझिया येथे तीन दिवसात 34 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रशियाने निवासी भागांना लक्ष्य करणारी क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा युपेनने केला आहे.
रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱया पुलावर युपेनने स्फोट केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. झापोरिझिया येथील एका बहुमजली इमारतीवर दहा रशियन क्षेपणास्त्रे पडल्याने तेथे प्रचंड हानी झाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युपेनने केर्च ब्रिज उडवल्याचा बदला 48 तासांत घेतला आहे. सोमवारी सकाळपासून रशियाकडून युपेनवर एकापाठोपाठ एक 75 क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या स्फोटांमध्ये युपेनमधील पार्कोव्ही पूलही उद्ध्वस्त झाला आहे. नायपर नदीवर पादचाऱयांसाठी हा पूल बांधण्यात आला होता.
रशियाने पुन्हा एकदा युपेनच्या झापोरिझियावरच सर्वाधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहाटे साडेचार वाजता झापोरिझियातील निवासी भागातच क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. झापोरिझियाचे लष्करी प्रमुख अलेक्झांडर स्टारुख यांनी ही माहिती दिली आहे. 24 तासांतील हा सलग दुसरा हल्ला होता. सोमवारी सकाळपासून रशियन रॉकेटचा मारा होत असल्याचे दिसून येत आहे. येथील रस्ते, वाहने, चिल्ड्रन्स पार्कवर स्फोटामुळे खड्डे पडले आहेत. या हल्ल्यात जीवितहानी झाली असून अनेक जण जखमी झाले असल्याचे युपेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले. किव्हच्या अनेक भागातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. किव्हव्यतिरिक्त, लिव्ह, झिटोमिर, खामेनिलत्स्की, डनेप्रो, मायकोलिव्ह आणि टेर्नोपिल शहरांमध्ये देखील स्फोट झाले. या हल्ल्यानंतर ‘आम्ही झुकणार नाही, आम्ही लढत राहू’, असे ट्विट युपेनच्या संरक्षण विभागाने केले आहे.
7 महिन्यांनंतर पुन्हा हल्ले तीव्र
रशिया-युपेन युद्ध सुरू होऊन 7 महिने झाले आहेत. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युद्धाच्या सुरुवातीला रशियाने युपेनची राजधानी किव्हवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले. तथापि, एप्रिलमध्ये युक्रेनमधील सैनिक आणि नागरिक यांच्यातील खडतर संघर्षानंतर रशियाने किव्हमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. आता पुन्हा एकदा रशियाने किव्हवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
युद्धाचा 229 वा दिवस
युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी स्फोटाचा व्हिडिओ टेलिग्रामवर शेअर केला असून, हा युद्धाचा 229 वा दिवस आहे. 229 व्या दिवशी, रशिया आपला संपूर्ण नाश करून आपल्याला पृथ्वीवरून पुसून टाकू इच्छित आहे. झापोरिझियामध्ये आपापल्या घरात झोपलेल्या लोकांना मारायचे आहे. किव्ह आणि निप्रोमध्ये काम करणाऱया लोकांनाही टार्गेट केले जात आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
नुकतेच रशियाने युपेनच्या ज्या चार भागांना आपल्या देशात विलीन करण्याची घोषणा केली होती, त्यात झापोरिझियाचे नावही सामील झाले होते. याव्यतिरिक्त, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 30 सप्टेंबर रोजी युपेनच्या लोहान्स्क, डोनेस्तक आणि खेरसनचे रशियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा संबंध क्रिमियामधील पुलावर झालेल्या बॉम्बस्फोटाशी जोडला जात आहे. रशियन मुख्य भूभाग आणि त्याच्या व्यापलेल्या क्रिमियन द्वीपकल्पाला जोडणाऱया पुलावर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट झाला. यानंतर आग लागली आणि पुलाचा काही भाग तुटून खाली पडल्यामुळे युपेनच्या दक्षिणेकडील भागात लढणाऱया रशियन सैन्याची रसद ठप्प झाली आहे.