12 लोक ठार, 35 इमारती नष्ट
@ किव्ह / वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्ध सुरूच असून पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार 25-26 जानेवारी रोजी रशियन सैन्याने युपेनियन शहरांवर 55 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 35 इमारती उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जर्मनीने 25 जानेवारी रोजी युपेनला आपल्याकडील लेपर्ड-2 हे प्रभावी रणगाडे पुरविण्याचा निर्णय घेतला.
गेल्या फेबुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेले युद्ध अद्यापही संपलेले नाही. दोन्ही देश आपापल्या पवित्र्यावर ठाम असल्याने संघर्षाची धग कायम आहे. रशिया वारंवार युक्रेनवर क्षेपणास्त्रे डागून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. आताही गेल्या चोवीस तासात 55 क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून खेरसन, हलावाखासह 11 भागात क्षेपणास्त्रे पडली. यात 35 इमारती उद्ध्वस्त झाल्या. काही क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. रशिया आता पायाभूत सुविधांना लक्ष्य करत असल्याचे युपेनचे म्हणणे आहे. 26 जानेवारी रोजी रशियन सैन्याने युपेनच्या ओडेसा शहरावर हल्ला केला. यादरम्यान काही क्षेपणास्त्रे तेथे बांधलेल्या दोन मोठय़ा पॉवर प्लान्टमध्ये पडली.