ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशासाठी लढाई सुरू झाली असून रशिययाने युक्रेनियन सैन्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचा ईशारा दिला आहे.
युक्रेन-रशिया युद्धात रशियाने युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहे. डोनबास प्रांतात असलेल्या युक्रेनियन सैन्याला रशियाने युक्रेनियन सैन्याला मंगळवारी शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले आहे. तसेच हा ईशारा मारियापोल या मोक्याच्या बंदराजवळ असणाऱ्या बंडडखोरांना सुध्दा दिला गेला.
परंतु युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच म्हणाले की “मॉस्कोचा प्रतिकार शेवटच्या क्षणापर्यंत करण्याचे वचन देऊन रशियाला कोणताही फायदा मिळू देणार नाही. “काल सुरु झालेल्या डोनबासची लढाई, ही लढाई रशियाच्या बाजूने जाणार नाही,” असे ते म्हणाले.
रशियाने असा दावा केला आहे की ते जलद नफा मिळवत असून 1,200 हून अधिक युक्रेनियन लक्ष्ये एका रात्रीत साध्य केली आहेत. डोनेस्तक प्रदेशात एक युक्रेनियन मिग -29 जेट खाली पाडण्यात आले, असा दावा रशियन अधिकार्याने केला आहे.
कीवमधील युक्रनियन सैनिकांना प्रतिकार थांबवण्याचे आवाहन करत”, मॉस्कोने मारियुपोल शहरातील बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवल्यास “जगण्याची हमी देण्यात येईल असे सांगितले. रशियाचे कर्नल जनरल मिखाईल मिझिंतसेव्ह यांनी युक्रेनियन सैन्याला मारियुपोलमधील अझोव्स्टल स्टील मिलमध्ये अडकलेल्या आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे.