वृत्तसंस्था/ माद्रिद
एटीपी टूरवरील येथे झालेल्या माद्रिद खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने प्रकृती नादुरुस्त असूनही एकेरीचे जेतेपद पटकाविले.
या अंतिम सामन्यापूर्वी रुबलेव्हला ताप आल्याचे जाणवले. प्रकृती नादुरूस्त असतानाही त्याने या अंतिम सामन्यात फेलिक्स ऑगेर अॅलिसीमेचा 4-6, 7-5, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव केला. सदर स्पर्धा क्लेकोर्टवर खेळवली गेली. एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाची ही दुसरी स्पर्धा रुबलेव्हने जिंकली आहे. गेल्या वर्षी माँटेकार्लो 1000 दर्जाची मास्टर्स टेनिस स्पर्धा रुबलेव्हने पहिल्यांदा जिंकली होती. या स्पर्धेत महिलांच्या विभागात पोलंडच्या इगा स्वायटेकने जेतेपद मिळविले आहे.