ओटवणे प्रतिनिधी
बावळाट येथील श्री देवी सातेरी माऊली कला क्रिडा व्यायाम मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत वडखोल तुळस येथील सद्दगुरू प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या भजन स्पर्धेत पिंगुळी येथील श्री रवळनाथ प्रासादीक भजन मंडळाने द्वितीय क्रमांक तर असरोंडी येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.
सातेरी माऊली मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्दघाटन माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सातुळी – बावळाट गावचे उपसरपंच स्वप्नील परब, माजी सरपंच उत्तम परब, गावचे पोलीस पाटील आबा परब, संतोष कानसे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद परब, ॲड. विठ्ठल परब, कवि कृष्णा देवळी, स्पर्धेचे परीक्षक प्रकाश चिले, मनिष तांबोस्कर, मंडळाचे सचिव विद्यानंद परब, उपाध्यक्ष अनिल परब, आंबोलीचे श्री सावंत, बावळाट ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष किरण परब, भास्कर परब, नकुल परब, अनिल सावंत, विनायक परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचा उर्वरीत निकाल पुढीप्रमाणे उत्तेजनार्थ श्री नवतरुण युवक प्रासादीक भजन मंडळ (माणगाव), देवीच्या महतीवरील उत्कृष्ट गजर आणि उत्कृष्ट गायक पुरुषोत्तम परब (वडखोल तुळस), उत्कृष्ट तबला ओमकार तळवणेकर, उत्कृष्ट पखवाज सचिन पांगम, उत्कृष्ट झांज वादक शिवराम सावंत, उत्कृष्ट कोरस आदिनाथ सिद्ध महापुरूष भजन मंडळ (जानवली)