Sagar Suraksha Kavach campaign starts from today
सागर किनारपट्टीवरील बंदोबस्त किती सशक्त आहे याची थेट परीक्षा घेण्याची मोहीम म्हणून ओळखली जाणारी सागर सुरक्षा कवच मोहीम आजपासून सुरू झाली आहे. तब्बल 36 तास कडक पोलीस बंदोबस्त असलेल्या ब्ल्यू टीमचे कवच भेदण्यासाठी रेड टीमही सज्ज झाली आहे. त्यामुळे आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेड टीमला प्रवेश न देण्यासाठी व प्रवेश केल्यास त्यांना पकडण्यासाठी किनारपट्टीवरील त्या त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी डोळ्यात तेल घालून सज्ज झाले आहेत. आज पहाटे सहा वाजता सुरू झालेली मोहीम उद्या सायंकाळी सहा वाजता समाप्त होणार आहेत. मालवण पोलीस ठाण्यासाठी ज्यादा पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मालवण / वार्ताहर