सांगली-पुण्यातील बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे देण्यात येणारा काकासाहेब खाडिलकर पुरस्कार सांगलीचे युवा शास्त्रीय गायक अभिषेक काळे यांना जाहीर झाला आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी बालगंधर्व स्मृती दिन साजरा केला जातो, या कार्यक्रम प्रसंगी संगीत रंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा अभिषेक काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१५ जुलै रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता अभिषेक काळे यांना त्यांच्या संगीत नाट्य कार्यातील योगदानाबद्दल काकासाहेब खाडिलकर या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर पुणेकर रसिकांसाठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी देखील आहे.
यामध्ये पं. राजा काळे, पं.उपेंद्र भट, अभिषेक काळे, बकुळ पंडित, सुरेश साखवळकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रोख रुपये १० हजार रुपये,
स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.