कुपवाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: अन्य गुन्हेगारांचे धाबे दणाणले
कुपवाड/प्रतिनिधी
कुपवाड शहरातील रेकाॅडवरील सराईत गुन्हेगार सूरज रमेश काळे यासह चारजणांच्या टोळीला सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.
सांगलीचे पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्य गुन्हेगारांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहे.
या कारवाईत संशयित सूरज रमेश काळे (वय २४, रा.जुना बुधगाव रोड, रेणुका मंदिराजवळ, कुपवाड ), राजअहमद मेहबुब शेख ( वय २१, रा.रामकृष्णनगर, कुपवाड), नितेश ऊर्फ नितीन कल्लाप्पा कोष्टी( वय २६, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड ), आकाश ऊर्फ लोकेश लक्ष्मण जाधव( वय २२, रा.रोहिणी कोल्ड स्टोअरेजमागे, कुपवाड) यांचा समावेश आहे.