मणेराजूरी/वार्ताहर
मणेराजुरीत साहेबराव चंद्रकांत शिदगणेश ( वय ३७ ) या युवकाचा किरकोळ कारणाने कुर्हाड व चाकूच्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान मणेराजूरी बसस्थानाकापासून हाकेच्या अंतरावर गव्हाण रोडवरील भरवस्तीत ही घटना घडली असून याप्रकरणी तीन संशयीत आरोपी असलेचे समजत असून यातील एकजण तासगांव पोलीसात स्वतःहून हजर झाला आहे.
याबाबत तासगाव पोलीस घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, आरोपी व साहेबराव शिदगणेश याची सायंकाळी सहाच्या दरम्यान स्टॅडचौकात किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती. यावेळी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली गेली होती. यातूनच पुढील घटना दोन तासात घडली.
संध्याकाळी नऊच्या दरम्यान साहेबराव हा दलित समाजमंदीरा जवळ आला असता त्याचेवर संशयीत तिघांनी कुऱ्हाड व चाकूने हल्ला चढविला यामध्ये साहेबराव हा तिथेच रक्ताच्या धारोळ्यात निपचित पडला. ग्रामस्थ व आसपासचे नागरिक या प्रकरणी भयभयीत झाले. पोलीस पाटील दिपक तेली घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी रक्ताच्या धारोळयात पडलेल्या साहेबरावला रुग्णवाहिकेतून तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णांची गंभीर स्थिती असलेने त्याला मिरज सिव्हीलमध्ये दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यालामृत घोषित केले. आरोपी हे व्यसानीधन असल्याची चर्चा गावात होती. तर खुनाचे नक्की कारण पोलीस तपासात निष्पन्न होईल .
गावात तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे , एफीआय नितीन केरा, पीएसआय नामदेव तारडे , संदीप गुरव यांनी भेट देवून तपासाच्या सूचना दिल्या. ‘फरारी आरोपीना शोधण्याचे आवाहन पोलीसांच्या पुढे आहे. तर लवकरच सर्व आरोपीना जेरबंद करू असा विश्वास संजीव झाडे यांनी व्यक्त केला.