महापालिकेतील बैठकीत निर्णय
सांगली : कोरोना काळानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होत असणाऱ्या गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. यावेळी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत गणेश मंडळ आणि नगरसेवक पदाधिकारी यांच्या विनंतीवरून गणेश मंडळांकडून प्रतिदिन आकारणी करण्यात येणाऱ्या फीमध्ये सवलत देत प्रति चौरस मीटर 10 रुपये आणि प्रति खड्डा 50 रुपये प्रमाणे एकदाच आकारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांनी घेतला. महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून मनपा प्रशासनाचे गणेश मंडळाकडून आभार मानण्यात आले.