प्रतिनिधी,कोल्हापूर
सन 2023 च्या अर्थसंकप्लीय अधिवेशनामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील करवीर विधानसभा अंतर्गत पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी 10 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर झाला असून यामध्ये पन्हाळा तालुक्यातील 5 कामे व गगनबावडा तालुक्यातील एका कामाचा असल्याची माहिती खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांनी दिली.
मंजूर कामामध्ये गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा रामा क्र. 177 पासून निवडे-वेसर्डे-असंडोली-कोदे खुर्द-कोदे बुद्रुक रस्ता प्रजिमा 24 च्या रुंदीकरणासह मजबूतीकरण करण्यासाठी ( भाग कोदे बुद्रुक ते कोदे खुर्द) 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर पन्हाळा तालुक्यातील रामा. क्र. 193 पासून बाजारभोगाव, किसरुळ, काळजवडे, पोबरे, कोलिक, पडसाळी ते कांजिर्डा घाटास मिळणारा जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता प्रजिमा क्र. 19 च्या रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी (भाग मानवाड ते चाफेवाडी), 2 कोटी 50 लाख रूपये तसेच रा.मा. क्र. 177 पासून परखंदळे, आकुर्डे, हरपवडे, गगनबावडा रा.मा. क्र. 177 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 39 च्या रुंदीकरणासह मजबुतीकरण करणे. (निवाचीवाडी गावाजवळ आर. सी. सी. गटर बांधणे) (भाग – निवाडीवाडी ते पाटीलवाडी) रस्त्यासाठी 1 कोटी 50 लाख रूपये, पन्हाळा तालुक्यातील प्रजिमा क्र. 78 पासून कळे, पुनाळ रा.मा. 193 ते दिगवडे, कोतोली रा.मा. 191 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 17 च्या रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी (भाग – कळे ते पुनाळ) 1 कोटी 60 लाख रूपये, पन्हाळा तालुक्यातील रा.मा. क्र. 177 पासून कोपार्डे, पडळ, माजगाव ,पोले ते रा.मा. 191 ला मिळणारा रस्ता प्रजिमा क्र. 18 किमीच्या रूंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी 1 कोटी 80 लाख मंजूर झाले आहेत. तसेच पन्हाळा तालुक्यातील कोल्हापूर, चिखली, वरणगे, पाडळी, यवलुज, करंजफेण, अणुस्कुरा रस्ता रामा. क्र. 193 च्या मजबुतीकरणासाठी 1 कोटी रुपये असा एकूण 10 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले. पावसाळ्यानंतर सदरच्या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.