संभाजीराजे यांनी सहाव्या जागेवर दावा सांगत सर्वांचा पाठिंबा मागितला यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान काल शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी दोन उमेदवार जाहीर करत संभाजीराजे यांचा पाठिंबा काढून घेतला. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज ट्विट करत संभाजीराजे यांना इशारा दिला आहे.
शिवसेना राज्यसभेची सातवी जागा लढवेल आणि जिंकून सुद्धा येईल यात कोणी कितीही आकडेमोड करावी. आकडे आणि वेळ हे दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे असा इशारा संभाीजीराजे यांना राऊतांनी दिला. यावरून संभाजीराजे यांचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले
संजय राऊत ट्विट करत म्हणतात, राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल?सहावी जागा शिवसेना लढेल.
कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे . जितेंगे असा इशारा राऊतांनी दिला आहे.
छत्रपतींच्या नावाने राजकारण करीत आलेली शिवसेना आज छत्रपतींनाच डावलत असल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना काय भूमिका घेते. संभाजीराजे यांच्यासाठी जागा सोडण्याचे उदारपण दाखवते की महाराष्ट्राच्या जनतेचा रोष ओढवून घेते हे पाहावे लागणार आहे.