क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यप्रदेश येथील बैतूनी इटारसी 33 व्या विद्याभारती राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत संत मीराच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
भारतीय आवास विद्यालय मध्यप्रदेश शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या प्राथमिक गटातील मुलींच्या पहिल्या सामन्यात संत मीरा संघाने मध्यक्षेत्राचा 5-3 असा पराभव केला. संत मीरातर्फे समीक्षा बुद्रुकने 3, ऐश्वर्या पत्तारने 2 गोल केले. दुसऱ्या सामन्यात दक्षिणमध्य क्षेत्रने पश्चिम उत्तर क्षेत्राचा 3-2 असा पराभव केला. संत मीराच्या समीक्षा बुद्रुकने 2, मेघा कलखांबकरने 1 गोल केला.
अंतिम सामन्यात संत मीरा संघाने उत्तर क्षेत्राचा 4-2 असा पराभव करीत विजय संपादन केला. संत मीराच्या समीक्षा बुद्रुकने 2, ऐश्वर्या पत्तारने व वर्षा परीटने प्रत्येकी 1 गोल केले. स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचा हँडबॉल संघ पात्र ठरला आहे. विजेत्या संघात कर्णधार समीक्षा बुद्रुक, ऐश्वर्या पत्तार, वर्षा परीट, दिशा जोशी, प्रणिता मजुकर, स्नेहा धनवडे, भावना कौजलगी, साक्षी पाटील, श्रुती कुंभार, सृष्टी तडकोड, सोनाक्षी देसाई, मेघा कलखांबकर या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, सुशांत मलतवाडी, सुमित सौंदत्ती यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.