ऐ वतन मेरे वतन चित्रपट
सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय राहणारी अभिनेत्री सारा अली खान सध्या स्वतःच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. साराने आता ‘ऐ वतन मेरे वतन’ चित्रपटाचे चित्रिकरण संपविले आहे. स्वतःच्या या चित्रपटाचे चित्रिकरण संपल्याची माहिती साराने इन्स्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करत दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून ऐ वतन मेरे वतन चित्रपटासाठी रात्रीच्या सत्रातील चित्रिकरण करत होते, परंतु आता हे चित्रिकरण पूर्ण केले असल्याचे तिने म्हटले आहे. सारा अली खानचा हा चित्रपट एकप्रकारे बायोपिक असणार आहे. हा चित्रपट 1942 मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. ऐ वतन मेरे वतन चित्रपटात सारा अली खान ही उषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. उषा मेहता यांनी स्वातंत्र्यलढय़ादम्यान गुप्त रेडिओ ऑपरेटर म्हणून कामगिरी पार पाडली होती.
उषा मेहता यांनी ‘काँग्रेस रेडिओ’ या गुप्त रेडिओ सेवेची सुरुवात केली होती. या रेडिओ सेवेच्या मदतीने त्या त्या काळातील सर्व माहिती तसेच बातम्या प्रसारित करत होत्या. साराचा हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दरब फारुकी यांची कथा लाभलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नर अय्यर यांनी केले आहे.
सारा याचबरोबर लक्ष्मण उकेटा यांच्या चित्रपटात विक्की कौशलसोबत दिसून येणार आहे. तसेच अनुराग बासू यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱया चित्रपटात ती आदित्य रॉय कपूरसोबत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.