Satara Rain Update : मंगळवारी रात्रीपासून सातारा शहर आणि पश्चिम भागामध्ये आहे. मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर,वाई,जावली,खंडाळा या भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.वाई तालुक्यातील जोर या गावी जाणारा रस्त्यावरील भराव वाहून गेल्यामुळे चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच रायगड हद्दीत आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळली आहे .महाबळेश्वरहून पोलादपूरकडे आणि पोलादपूर होऊन महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सतत पाऊस असल्याने सकाळपर्यंत सर्व दरड हटवली जाणार.आंबेनळी घाटातून प्रवास न करण्याचे पोलादपूर तहसीलदारांनी आवाहन केले आहे.
वाई तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या जोर भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे.महाबळेश्वर भागात देखील पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हवामान खात्याकडून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.