औरंगाबादचा प्रल्हाद घनवट प्रथम ; महिलामध्ये माण देशाच्या रेश्मा केवटे प्रथम
सातारा/प्रतिनिधी
निसर्ग रम्य अशा यवतेश्वर घाटातून रिमझिम पावसात सातारा हाफ हिल मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेवर महराष्ट्राने मोहोर उमटवली. प्रथम क्रमांक औरंगाबाद येथील प्रल्हाद घनवट याने १ तास ९ मिनिटात पटकावला. महिलांच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवडच्या रेश्मा केवटे यांनी १ तास २४ मिनिटात पूर्ण करून गतवर्षीचे रेकॉर्ड मोडले.
सातारा हाफ हिल मरेथॉनचे उदघाटन सातारचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते ध्वज फडकवून झाले. पहाटे सहा वाजता धावपट्टीवरील धावपट्टूना प्रोत्साहन करण्यासाठी सातारकर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम येण्याचा मान विक्रिमी वेळेत औरंगाबादचे प्रल्हाद घनवट यांनी पटकवला. त्यांनी १ तास ९ मिनिटात अंतर पूर्ण केले. त्यांच्या पाठोपाठ सातारा जिल्ह्यातील मांढरदेवाचा कालिदास हिरवे याने १ तास १२ मिनिटात अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तिसरा क्रमांक कोल्हापूर येथील परशुराम भोई यांनी १ तास १७ मिनिटात पूर्ण करून मिळवला. महिलामध्ये पहिला येण्याचा मान माण तालुक्यातील म्हसवड येथील रेश्मा केवटे हिने १ तास २४ मिनिटात पूर्ण करून पटकावला. दुसरा क्रमांक नैनीताल येथील मनीषा जोशी यांनी १ तास ४४ मिनिटात पूर्ण करून पटवकाला. या स्पर्धेला स्पर्धकानी मोठा सहभाग दाखवला होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तांडव हे ढोल पथक काम करत होते.ठीक ठिकाणी सातारकर धावपट्टूचे स्वागत करत होते.स्पर्धेच्या शेवटी पावसाने विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.