माटोळी सामान खरेदीसाठी झुंबड : सजावट वस्तूने बाजार फुलला,गणेश मूर्ती चित्रशाळा गजबजल्या,सरकारच्या गणेश चतुर्थी बाजाराला थंडा प्रतिसाद
प्रतिनिधी /वाळपई
बुधवारपासून सुरू होणाऱया गणेशोत्सवासाठी विविध प्रकाराच्या वस्तुंच्या खरेदसाठी वाळपई, होंडा भागामध्ये नागरिकांची झुंबड उडाली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या वस्तुंची दुकाने वाळपई शहरांमध्ये थाटण्यात आलेली आहेत. याना चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र गोवा सरकारतर्फे सुरू केलेल्या वाळपई व होंडा येथील कदंब बस स्थानकावरील चतुर्थी बाजाराला थंडा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी प्रत्येक घरामध्ये गणेश बाप्पाचे आगमन होणार आहे. आपल्या घरातील गणेशमूर्ती ही सुबक व सुंदर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी चित्रकला शाळेमध्ये गणेशमूर्तींची निवड होत असते. सध्यातरी अनेक चित्रशाळांमध्ये रंगकाम अंतिम टप्प्यात असून मूर्तिकार गणेशमूर्ती आकर्षक करण्यासाठी रात्री जागवत आहेत.
यंदा आपण 200 पेक्षा जास्त गणेशमूर्ती तयार केलेल्या आहेत. मात्र वारंवारपणे खंडित होणाऱया वीज पुरवठय़ामुळे गणेश मूर्तीना रंग देण्यासाठी उशीर होत असल्याचे पाली सत्तरी येथील ज्ये÷ मूर्तिकलाकार बुधाजी गावकर यांनी सांगितले.
वाळपई, होंडा येथील सजावटीची दुकाने सजली
गणेश चतुर्थीच्यावेळी गणेश बाप्पाचे आगमन होण्यापूर्वी त्याची जोरात तयारी करण्यात येत असते. यंदाही पूर्वतयारीला जोर आलेला आहे. वाळपई शहरांमधील दुकानांमध्ये अनेक सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी गणेश भक्तांनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
माटोळी सामानासाठी फातिमा कॉन्व्हेट रोड गजबजणार
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ग्रामीण भागामध्ये घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये गणेश चतुर्थीत बांधण्यात येणाऱया माटोळीसाठी सामान उपलब्ध असते. गेल्या आठ दिवसापासून सदर सामान गोळा करण्यात येत आहे. वाळपई शहरातील फातिमा कॉन्व्हेट रोडवर माटोळी बाजार भरत असून आज मंगळवारी हा रोड पूर्णपणे गजबजण्याची शक्मयता आहे.
सत्तरीच्या जंगलामध्ये नैसर्गिक घटक गोळा करून ते विकण्याची प्रक्रिया आपण गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे. याला गणेश भक्तांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. यंदाही अशाच प्रकारचा प्रतिसाद लाभेल अशी आशा माटोळी सामान विपेते बातू गावडे यांनी व्यक्त केलेली आहे.
सरकारच्या चतुर्थीत बाजाराला मात्र थंडा प्रतिसाद
दरम्यान स्वयंपूर्ण गोवा याच्या माध्यमातून वाळपई व होंडा येथील कंदबा बसस्थानकावर विशेष चतुर्थी बाजाराला सुरुवात झालेली आहे. मात्र या ठिकाणी गणेश चतुर्थीसाठी उपयुक्त अशा वस्तू उपलब्ध होत नसल्यामुळे ग्राहकाने पाठ फिरविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.