प्रतिनिधी /बेळगाव
भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स येथे ‘सावन’ हा दोन दिवसांचा महोत्सव उत्साहात पार पडला. बीए, बीकॉम, बीएस्सी आणि एमकॉम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उत्सवाचा हेतू होता.
प्राचार्य डॉ. श्रीकांत कोंकणी यांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांनी समस्या सोडविण्यासाठी नीट विचार करण्याचे कौशल्य विकसित करावे, असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे यांनी विद्यार्थ्यांनी पालकांचा आदर करावा, असे सांगितले.
याप्रसंगी बीएस्सी परीक्षेत 94.67 टक्के गुण घेऊन दहावा क्रमांक पटकाविलेल्या सुप्रिया थाईकाई हिचा 10 हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार केला.
या उत्सवात आईसब्रेकिंग, ऍडमॅड शो, पेपर प्रेझेंटेशन, मार्केटिंग, ट्रेझर हंट व सांस्कृतिक स्पर्धा घेतल्या. सांगता समारंभाला बेल्लद कॉलेजचे प्राचार्य बी. जयसिंहा, संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डण्णावर, प्राचार्या सुनीता देशपांडे, समन्वयक नीता गंगरेड्डी तसेच भरतेश मेडिकल कॉलेजचे हिराचंद कलमनी, संजय शिरुगुप्पी, डॉ. ए. आर. रोट्टी आदी उपस्थित होते.